देशात जाणीवपूर्वक राष्ट्रवाद निर्माण केला जातोय

0

धुळे । शोषण करणार्‍या जातीच्या शोषण लक्षात येऊ नये म्हणून देशात जाणीवपूर्वक राष्ट्रवाद निर्माण केला जात आहे. राष्ट्रवाद ही सहकल्पना भारतीय नाही तर ती युरोपातून आपल्या देशात आली आहे. जर इतका राष्ट्रवाद देशात माजवणार्‍यांची मुले का अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी पाठविली जातात. त्यांची मुले का सैनात भरती केली जात नाही, असा सवाल लोकशाहीर संभाजी भगत यांनी धुळ्यात बामसेफच्या राज्य अधिवेशनात राष्ट्रवाद या विषयावर मत मांडतांना उपस्थित केला. यावेळी व्यासपीठावर संजय मोहिते, राहुल वाध, प्रा.संजय मोहिते, प्रा.संदीप निकम, प्रा.संजय बाविस्कर, प्रा.सतीष निकम, प्रा.मोहन मोरे, पूर्णाली मराठे उपस्थित होते. पुढे बोलताना संभाजी भगत म्हणाले की, देशात राहणार्‍याकडून राष्ट्रवादाच्या प्रमाणपत्र मागितल्या जात आहे. जो सरकारविरूद्ध व्यवस्थेविरूद्ध बोलेल त्याला देशद्रोही ठरविल्या जात आहे.

प्रत्येक जात म्हणजे एक राष्ट्र
1937 साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनाही जाती व्यवस्थेविरूद्ध बंद पुकारले म्हणून देशद्रोही ठरविण्यात आले होते. त्याला उत्तर देताना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की माझ्या माणसाच्या उध्दारासाठी मी लढा देत राहील.प्रत्येक जात हे राष्ट्र आहे. जातीच राष्ट्र तयार झाल आहे. आजही देशात हजाराच्यावर जाती आहे. देशात जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाला तर अगोदर तिची जात शोधली जाते. अत्याचार झालेल्या महिलाची जात कशी असू शकते. जाती व्यवस्थेचा नियम जोपर्यंत आपल्याला सापडत नाही तोपर्यंत आपण जाती व्यवस्था बदलू शकत नाही. देशात काही ठिकाणी हिंदू राष्ट्र घोषित केले आहे. तर काही ठिकाणी ते अघोषित आहे. देशात मुस्लीम व दलितांवर हल्ले वाढले आहे. मात्र सत्ताधारी विरूद्ध लढण्यासाठी फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधान हे एक हत्यार आहे. ज्या अजुनही ते गिळू शकलेले नाही आणि हा देश संविधानाच्या पायावर उभा आहे. तो कोणीही बदलू शकत नाही. त्यानंतर प्रा.संजय बाविस्कर, प्रा.राहुल वाघ, प्रा.संदीप मोहिते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने बामसेफच्या कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.