देशात नोटबंदी करून शेतकर्‍यांसह नागरीकांची आर्थीक कोंडी

0

जळगाव : नोटबंदी धोरणाने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोडकळीस निघाली असून दुष्काळाने ग्रस्त असलेल्या शेतकरी बांधवांना अद्याप पावेतो अनुदान प्राप्त झाले नाही. शेतमालाला भाव नाही. जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प झाले असून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या गोठा शेड व विहीरींचे हजारो प्रस्ताव प्रलंबित आहेत, बेरोजगारांना काम नाही. केंद्रात भाजपाची सत्ता येवून जवळपास 3 वर्षाचा कालावधी झाला आहे. केंद्रात व राज्यातील नेते मंडळींनी फक्त घोषणांचा पाऊस पाडला मात्र प्रत्यक्षात कोणतीही कृती नसल्याने नागरीकांसह शेतकर्‍यांची मोठ्याप्रमाणावर आर्थीक कोंडी केली असल्याच्या निषेधार्थ आज शहर राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रसतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

जारगाव चौफुलीवर रास्तारोको तर महिलांचा थाळीनाद आंदोलन
नोटबंदी कसली ही तर आर्थिक नसबंदी, अशा घोषणा देत पाचोरा येथे माजी आमदार यांच्या नेतृत्वात जारगाव चौफुलीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तर चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते जेष्ठ नेते प्रदीपदादा देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सोळंखे, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी विधानसभाध्यक्ष अरुभाई गुजराथी यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करतांना नोटाबंदी विरोधातील जनआक्रोश आंदालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

आंदोलनात यांचा सहभाग
जळगाव (ग्रामीण) तालुकाध्यक्ष संजय वराडे, चिंचोली ग्रा.पं.सदस्य ज्योती वराडे, कमलबाई लाड, येणाबाई कोळी, सरुबाई ढाकणे, सवणा धुमाळ, संगिता पढाळ, सविता पढाळ, आशा ढाकणे, लता पाटील, विमल पढाळ, पुनम पाटील, प्रतिभा घुगे, बेबा वाघ, आक्का वाघ, मनिषा वाघ, नंदाबाई कोळी, वंदना कोळी, प्रा.संजय पाटील, कमल पढार, पमाबाई जाधव, सुरेखा पढार, सरला पढार आदी महिलांची मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

महिला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन
जळगाव शहर जिल्हा कॉग्रेस महिला मोर्चाचे जिल्हाध्यक्ष डॉ. भंगाळे व कार्याध्यक्ष डॉ. राधेराम चौधरी यांच्या मार्गदर्शनात अरूणा पाटील, सकिना तडवी, मनिषा गवस, मिनाक्षा जावळे, शुक्लाताई यांच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन टॉवर चौक येथे करण्यात आले. कफील शेख, मनोज चोैधरी, अमजद पठाण, जाकीर बागवान, प्रल्हाद सोनवणेे, श्री. गाढे, रजत यादव आदी सहभागी झाले होते.