एरंडोल प्रतिनिधी । केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात सर्वत्र असंतोष निर्माण झाला आहे. पुढील वर्षी होणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन निश्चित परिवर्तन होईल असा विश्वास आमदार डॉ.सतीश पाटील यांनी व्यक्त केला.
श्री क्षेत्र पद्मालय येथे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन देऊन त्यांची सरकारकडून दिशाभुल केली जात असल्याचा आरोप केला. युवकांनी धर्मांध शक्तींपासून सावध राहावे असे आवाहन केले. आगामी निवडणुकीत जिल्ह्यात सर्वाधिक यश राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळेल असा दावा त्यांनी केला.
याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य रोहन पवार, पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव पाटील, जिल्हा सरचिटणीस अमित पाटील यांनी पदाधिकार्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पाटील, शहराध्यक्ष बबलू चौधरी, जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, संदीप वाघ, उपसभापती प्रताप सोनवणे, डॉ.सुभाष देशमुख, किसान सेलचे तालुकाध्यक्ष रामधन पाटील, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष विकास साळुंखे, शहराध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार आदी उपस्थित होते.