काँग्रेसच्या हातातून हिमाचलची सत्ता गेल्याने भाजपच्या या दिशेने आणखी एक पाऊल पुढे गेले आहे. 10 कोटींपेक्षा अधिक कार्यकर्त्यांच्या फौज असणार्या भाजप 132 वर्षे जुन्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला 4 राज्यांपुरते मर्यादित केले आहे, तर भाजपने 19 राज्यांना भगवा रंग दिला आहे. देशाच्या राजकारणात मतदारांची संख्या आणि क्षेत्रफळाच्या हिशेबाने सर्वात मोठ्या मानल्या जाणार्या राज्यांत भाजप स्वबळावर सत्तेत आहे. यात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, हरियाणा, झारखंड आणि मणिपूर सामील आहेत. दुसरीकडे देशातील इतर 5 राज्यांत राज्य बिहार, आंध्र प्रदेश, सिक्किम, नागालँड आणि जम्मू- कश्मीरमध्ये आघाडी करून भाजप सत्तेत आहे. 132 वर्षे जुना काँग्रेस पक्ष आपल्या चुकांमुळे आणि भाजपच्या वादळापुढे हळूहळू गायब होताना दिसत आहे. सध्या फक्त चार राज्यांतच काँग्रेसची सत्ता आहे. यात फक्त कर्नाटक आणि पंजाब अशी दोन मोठी राज्ये आहेत ज्यांची लोकसभेत धमक आहे. याशिवाय मेघालय आणि मिझोराममध्येही काँग्रेस सत्तेत कायम आहे.
हिमाचलमध्ये भाजपचा सिंह गेला…
हिमाचल प्रदेशात भाजपने 44 जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले असले तरी, काँग्रेसचे वीरभद्र विरुद्ध प्रेमकुमार धूमल अशी लढत झालेल्या या निवडणुकीत भाजपने आपला सिंह गमावला आहे. तर अर्की मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री वीरभद्र सिंह आणि शिमला मतदारसंघातून त्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह हे दोघेही बापलेक जिंकून आलेत. काँग्रेसचे या राज्यातील सत्ता गमावित 21 जागा जिंकल्यात. तर भाजपला 48.70 व काँग्रेसला 41.90 टक्के इतके मतदान झाले. राज्यातील 68 जागांसाठी 9 नोव्हेंबररोजी मतदान घेण्यात आले होते. यंदा प्रथमच 74.61 टक्के इतके विक्रमी मतदान झाले होते. तर 2003 मध्ये सर्वाधिक 72.61 टक्के इतके मतदान झाले होते.