हैदराबाद : एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी भाजपाला लक्ष्य केले. देशात भयावह वातावरण तयार केले जात असल्याचे ते म्हणाले. ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यामध्ये काहीही सहभाग नोंदवला नाही, पण महात्मा गांधींच्या मारेकर्यांची ज्यांनी साथ दिली त्या शक्तींचा देशात भयावह वातावरण तयार करण्यामागे हात आहे, असे ते म्हणाले.ज्यांनी महात्मा गांधींना गोळी घातली, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यात कधी सहभाग घेतला नाही, याउलट इंग्रजांची साथ दिली अशा शक्ती देशात भयावह वातावरण तयार करत आहेत, अशी घणाघाती टीका ओवेसी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आयोजित एका सभेत बोलताना केली.