देशात भ्रष्ट्राचार सुरूच

0

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी निवडणूक काळात देशात मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार वाढला असून भ्रष्ट्राचार मुक्तीचा नारा देत सत्ता मिळविली मात्र भाजप सत्तेत आल्यानंतर देखील भ्रष्ट्राचार संपलेला नाही. फोर्ब्जच्या मासिकाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारतातील भ्रष्ट्राचार वाढतच असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून कॉंग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठविली आहे. कर्नाटकमधील भ्रष्टाचारात थेट सहभागी असलेल्याना भाजपकडून उमेदवारी देण्यात आल्याचे आरोप कॉंग्रेसने ट्वीटरच्या माध्यमातून केले आहे.