जळगाव। भा रत हा तरुणाचा देश आहे. कोणाच्या एकाच्या बोलण्याने भारत महासत्ता होणार नाही तर यासाठी तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे. जळगाव च्या लोंकानी आदर सम्मान दिला त्या बद्दल भारावून गेलो असल्याचे प्रतिपादन बी.व्ही.जी. इंडियाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी केले आहे. ते जळगाव शहरातील ॠरोटरी क्लब व भारत विकास परिषद आयोजित कल्पनेपलीकडचे यश या विषयावर व्याख्यान देतांना बोलत होते. यावेळी व्यासपिठावर रोटरीचे अध्यक्ष नित्यानंद पाटील, मानद सचिव विजय जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेम कोगटाच्यासह सभागृहात नागरिकांनी उपस्थिती लावली होती.
शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद दैवत केले
वडिलांनी नेहमी व्याख्यानाच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी सांगायचे महापुरुषान बद्दल मोठा आदर होता. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद याना दैवत मानले लहान पाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो वडिलांची मुंबईला बदली झाली तेव्हा पासून ते आजारी पडायला लागले आई ने 200 रुप्याचे दागिने विकून वडिलांचा उपचार केला . मात्र यश मिळाले नाही त्याचे निधन झाले. मूळचा सातारा जिल्ह्यातील असताना पुण्यात जाण्याचे ठरले आई ने 15 हजार रुपये शिक्षणा साठी कर्ज घेतले त्यानंतर पुण्यात आल्या नंतर पुढचा संघर्ष केला. इच्छाशक्ती असल्यास यश नक्की मिळणार असल्याचा विश्वास गायकवाड यांनी ब्यक्त केला आहे.
108 मुळे आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो
तरुणांना एखादे काम करायचे असल्यास त्याची अंतरप्रेरणा जागृत होणे महत्वाचे असते. नाहीतर कोणतेही काम केल्यास पालथे घड्यावर पाणी अशी अवस्था होते. राज्यशासनाच्या वतीने 108 या रुग्णवाहिका सेवा सुरु करण्यात आली असून यासाठी आम्ही राज्य शासनाची निविदा भरली होती. काम मिळताना आम्हाला खूप त्रास देण्यात आला यासाठी न्यालयालयीन लढाई लढलो अखेर निविदा आमची पसंती झाली. 9 हजार 400 रुग्णवाहिका ची सुविधा बी.व्ही.जी.च्या माध्यमातून पुरवण्यात येत आहे. एखाद्या ठिकाणी जर अपघात झाल्यास आपण 108 रुरुग्णवाहिकेला फोन करू शकतात. यामुळे आपण कोणाचे तरी प्राण वाचवू शकणार आहे. यामुळे आपल्या नातेवाइकामध्ये याचा प्रचार प्रसार करण्याचे आवाहन हणमंतराव गायकवाड यांनी केले.
तरूणांनो एकत्र या!
एखादा उद्योग सुरु करण्याच्या आगोदर कल्पना करणे आवश्यक आहे. भारत महासत्ता होणार असे नेहमी सांगितले जाते. स्वामी विवेकानंद म्हणत मला अखंड भारताच्या समृद्धी साठी 100 युवक हवे होते. त्यामधील मी एक असून तरुण एकत्र आल्यास भारत महासत्ता होणे शक्य असणार आहे. एकीहेच बळ हे सूत्र लक्षात घेणे गरजेचे आहे. कौशल्य विकास झाल्यास रोजगार निर्मित होणार आहे. बी.व्ही.जी.च्या माध्यमातून एकूण 25 हजार युवकांना दरवर्षी तयार करण्यात येत आहे.त्यांना असे ठोकून तयार करीत आहे कि त्यांना जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यास त्याला काम मिळेल.