देशात रस्ते अपघातात ३ वर्षात ४.४५ लाख लोकांचा मृत्यू !

0

नवी दिल्ली-सरकारने देशात होणाऱ्या रस्ते अपघातबाबत चिंताजनक माहिती दिली आहे. २०१५-१७ दरम्यान तीन वर्षात रस्ते अपघातात तब्बल ४.४५ लाख जणांना जीव गमवावा लागला आहे. सरकारने लोकसभेत ही माहिती दिली. खासदार राकेश सिंह यांनी केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना परिवहन राज्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ही माहिती दिली.

२०१५ मध्ये पाच लाखाहून अधिक रस्ते अपघात झाले त्यात १ लाख ४६ हजार १३३ जणांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये ४ लाख ८० हजार ६५२ अपघात झाले त्यात १ लाख ५० हजार ७८५ जणांचा मृत्यू झाला. २०१७ मध्ये ४ लाख ६४ हजार ९१० अपघात झाले, त्यात १ लाख ४७ हजार ९१३ जणांना जीव गमवावा लागला आहे.