देशात ४९९ रुग्णांना कोरोनाची लागण

0

नवी दिल्लीः देशात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, ताज्या आकडेवारीवरून ४९९ रुग्णांना याची लागण झाल्याचे समोर आले आहे. एका दिवसात १०३ रुग्णांना लागण झाली आहे. आतापर्यंत देशात १० रुग्णांचा जीव गेला आहे. महाराष्ट्रात जवळपास ९७ रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये ६० लोक संक्रमित झाल्याचे समोर आले आहे.

या जीवघेण्या रोगाला थोपवण्यासाठी ३० राज्यांनी लॉक डाऊन केलं आहे. पंजाब, महाराष्ट्र, चंदीगडमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. दिल्लीतही कर्फ्यूसदृश्य परिस्थिती आहे. कर्नाटकात ३३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात ३० लोक कोरोना संक्रमित आहेत. दिल्लीत २९ लोकांना याची बाधा झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये २९ संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्येही ३ संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या ९७ असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये २१ जण संक्रमित आढळले असून, एकाचा मृत्यू ओढवला आहे. पश्चिम बंगालमध्ये सात जणांना संसर्ग झालेला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूला नियंत्रित करण्यासाठी सरकारनं काही निर्बंध लादले असून, त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.