देशात 83 ठिकाणी रक्तदान शिबीर

0

पुणे । निरंकारी जगतामध्ये 1981 सालापासून 24 एप्रिल हा दिवस मानव एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी 1980 साली मिशनचे तिसरे सदगुरु बाबा गुरुबचन सिंहजी महाराज यांनी सत्य, प्रेम, शांती, मानव एकता या साठी संघर्ष करताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती. मार्च, 1987 मध्ये बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी संत निरंकारी मंडळाच्या सर्वसाधारण सभेत 24 एप्रिल रोजी मानव एकता दिवसानिमित्त जागोजागी रक्तदान शिबिराचे आयोजन करून बाबा गुरुबचन सिंहजी आणि अन्य शहीद संतांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय घेतला.

या वर्षी देशभरामध्ये मिशनच्या मानव एकता दिवसानिमित्त संपूर्ण 24 एप्रिल रोजी मानव एकता दिवस साजरा होणार आहे. त्याचबरोबर संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनद्वारा 83 रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातून संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम, मार्केटयार्ड येथे 24 एप्रिल, मंगळवार याच दिवशी सकाळी 8 : 00 ते 5 : 30 या वेळेत रक्तदानाचे महाभियान आयोजित करण्यात आले आहे. मिशनच्या माध्यमातून पहिले रक्तदान शिबीर नोव्हेंबर 1986 साली दिल्ली मध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी मिशन चे तत्कालीन सदगुरु बाबा हरदेव सिंहजी महाराज यांनी स्वतः रक्तदान केले होते, त्यावेळेस रक्त नाल्यांमध्ये न वाहता ते नाड्यांमध्ये वाहावे असा उद्घोष त्यांनी केला होता.

जनजागृतीसाठी पथनाट्य, रॅली
विशाल रक्तदान शिबिराच्या जनजागृती साठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक, तसेच सेवादल यांनी 22 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत पथनाट्य, रॅलीचे आयोजन पुणे परिसरात केले आहे. अशा विविध परिसरामध्ये जाऊन संत निरंकारी मिशनचा तसेच रक्तदान शिबिराचा आवाज पोहोचवण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्याचे संत निरंकारी मंडळाचे झोनल इंचार्जताराचंद करमचंदानी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे कि आपण ही सर्वजण या रक्तदान शिबिरामध्ये सामील होऊन या मानवतेच्या कार्यामध्ये योगदान द्यावे.