देशाने दीर्घ लढाईसाठी तयार राहावे – नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली: करोना विषाणूविरुद्धची लढाई ही दीर्घकालीन लढाई असून, देशातील १३० कोटी जनता या युद्धामध्ये जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे. या लढाईत थकून चालणार नाही, तसेच हारूनही चालणार नाही. दीर्घ लढाई असूनही आम्हाला विजयी व्हायचे आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत विजयी होणे हाच एक आपला संकल्प आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले.
भारतीय जनता पक्षाच्या ४० व्या स्थापनादिनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, भारताने करोनाविरोधात उचलेल्या पावलांचे जागतिक आरोग्य संघटनेनेही प्रशंसा केली आहे. करोनाचा सामना करण्यासाठी आपण केलेले प्रयत्न हे एक वेगळे उदारहण असल्याचेही ते म्हणाले. आपल्या देशाने योग्य वेळी करोनाचा धोका ओळखला. हातात वेळ असल्याने देशाने एक व्यापक युद्धाची सुरुवात केली. भारताने एकावर एक असे मोठे निर्णय घेतले. यामध्ये केंद्र सरकार सर्व राज्यांना सोबत घेत पुढे जात असल्यातेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे ५ आग्रह धरले आहेत. हे ५ आग्रह महत्त्वाचे संकल्प असून त्यांद्वारे करोनाचा पराभव करण्यात मोठी मदत मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भाजप कार्यकर्त्यांना केले ५ आग्रह

१. गरिबांना जितके जमेल तितके रेशन द्या.
२. आपल्यासह ५ इतर लोकांना मास्क द्यावेत.
३. देशाची सेवा करणार्‍या लोकांना धन्यवाद द्या. यात डॉक्टर्स, नर्स, सफाई कर्मचारी, पोलिस, बँक-पोस्ट कार्यालयातील कर्मचारी आणि इतर सरकारी कर्मचार्‍यांचा समावेश आहे.
४. आरोग्य सेतू अ‍ॅप अधिकाधिक लोकांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करवून घ्या. प्रत्येक कार्यकर्त्याने कमितकमी ४० लोकांच्या फोनमध्ये हे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगावे.
५. युद्धाच्या काळात लोक देशाला नेहमीच दान देत आले आहेत. करोनाविरुद्धची लढाई ही देखील मानवतेसाठी लढाई आहे, असे समजून पीएम केअर फंडात दान द्या.

जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे. या लढाईत थकून चालणार नाही, तसेच हारूनही चालणार नाही. दीर्घ लढाई असूनही आम्हाला विजयी व्हायचे आहे. करोनाविरुद्धच्या लढाईत विजयी होणे हाच एक आपला संकल्प आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले.