देशी दारूची अवैध वाहतूक : वरणगावात कारवाई

0

वरणगाव- देशी दारुची अवैध वाहतूक करताना बोहर्डी फाट्यानजीक जळगाव गुन्हे शाखेने एकास अटक करीत त्याच्याजवळील 27 हजार रुपयांची दारू जप्त केली. सोमवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. वरणगाव पोलिस ठाण्याचे हवालदार सुनील वाणी, नागेंद्र तायडे व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र पाटील, दादाभाऊ पाटील, दीक पाटील यांनी बोहर्डीजवळ सापळा रचून आरोपी संशयीत अरोपी राजू प्रकाश माळी (28, रा.सिध्देश्वरनगर, वरणगाव) यास दुचाकी (एम.एच.19 ए.एस. 9624) सह ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध वरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला.