देशी पिस्तुलासह दोघांना अटक

0

चिंचवड- देशी बनावटीचे पिस्तुल जवळ बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण 76 हजार 150 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही क ारवाई मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास भाटनगर येथे पिंपरी पोलिसांनी केली. विकास कांबळे (वय 28, रा. पत्राशेड, पिंपरी) आणि अमीर उर्फ राजा युसुफ शेख (वय 18, रा. बौद्धनगर, पिंपरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटनगर येथे दोघेजण दुचाकीवरून आले असून त्यांच्याजवळ पिस्तुल असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पो लिसांनी विकास आणि अमीर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करत अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. यावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.