चोपडा : अपार कष्टाशिवाय जीवनात यश मिळत नाही. त्यामुळे टीव्ही पासून लांब राहून पुस्तकात डोके घाला. मुलाचे बरे व्हायचे असेल तर टीव्ही पाहणे बंद करा. सिरीयलमध्ये आपण अंधश्रद्धा, दुःख, ताण पाहतो. यामुळे मनावर वाईट परिणाम होत आहे. आजकाल पुरुषांनी जे वाटोळं केलं असून देशाचं बरं व्हायचं असेल तर मुलीशिवाय पर्याय नाही. असे मत रंगकर्मी शंभु पाटील यांनी बोलतांना सांगितले. कस्तूरबा माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक महोत्सवात उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर कस्तूरबा महिला समाजाचे कार्यकारी अध्यक्ष अॅड.संदीप पाटील, उपाध्यक्षा सुशीला महाजन, मुख्याध्यापक आर.डी. साठे, एल.एच. अहिरे, पर्यवेक्षक जी.जे. शिंदे आदी उपस्थित होते.
नागरिकांनी विविध विषयांवर केली चर्चा
देश व जग दररोज बदलत असून शेतीत जे पिकतं आहे त्याला बाजारभाव नसून अश्या काळात मुलींनी शिक्षण घेतलं तर निश्चिंतच मुली काहीही करू शकतात. सैराट मधील नागराज मंजुळे या माणसाने मोठे नाव कमविले असून शिक्षण घेत असताना तीन वेळा नापास झाला आहे. गरीब घरातील मुलगा हा परदेशात जाऊन पाच हजार जातीवर प्रबंध लिहत आहे. शिवाजी महाराजच्या फोटोजवळ सावित्री बाईचा फोटो ठेवा. तुम्हला जीवनात यशस्वी व्हयचे असेल तर जीवनात सर्व मुलांनी शिवाजी महाराज, डॉ आंबेडकर, महात्मा फुले, समजून घ्या. नुसतं शिवाजी महाराज कि जय म्हणु नका. तुमच्याकडे काय आहे, याचा शोध घ्या, तुमचे मोठे होणे कुणीही थांबवू शकत नाही. जो समज वाचत नाही, विचार करत नसतो समाज नष्ट होतो, अशी माहिती शंभू पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे संचलन व्ही.पी.कोष्टी यांनी केले.