शिरपूर । देशातील अकरा राज्यातील 321 जिल्ह्यामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी निघालेल्या विश्वशांती रथयात्रेचे नाशिक जिल्ह्यातून साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे आगमन झाले. विश्वशांती रथयात्रेचे येथील स्थानिक सकल जैन संघ समाजाच्यावतीने गावातून शोभायात्रा काढून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तामिलनाडू राज्यातील श्री तीर्थक्षेत्री कृष्णगिरी येथून विश्वशांती रथयात्रा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दाखल होत शनिवारी धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आगमन झाले. जैन समाजाच्यावतीने रथाचे जंगी स्वागत करण्यात आले. गावातून मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा काढून महावीर भवन येथे शोभायात्रेचा समारोप झाला.
यांची होती उपस्थिती
यावेळी समाजाचे माजी अध्यक्ष धनराज कोचर-जैन यांच्याहस्ते स्वागत झाले. रथात विराजमान सुबक व मनमोहक भगवान पार्श्वनाथ मूर्तीचे दर्शन जैन समाजासह इतर समाज बांधवांनी मोठ्या भावभक्तीने घेतले. महिलांनी विशेष साडी परिधान करून तर पुरूष मंडळीनी श्वेत वस्र परिधान करून भाविकांचे लक्ष वेधले होते. यावेळी माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जि.प. सदस्य अॅड. ज्ञानेश्वर एखंडे, धनराज जैन, सुभाषचंद गोगड, जीवनकुमार खिवसरा, अशोक कोचर, रिखबचंद गोगड, डॉ. गिरीष जैन, विलासराव घरटे, प्रमोद गागुर्डे, डॉ. टाटीया, अनिल गोगड, कुंदनलाल गोगड, स्वरूप गोगड, रिखबचंद टाटीया, कपील टाटीया, प्रविण गोगड, रमेश गोगड, दिनेश कोचर, रामलाल बुरड, प्रदीप संघवी, कैलास गोगड, सुनील गोगड, सुभाषचंद्र राका, दगडूलाल राका, अनिल ओस्तवाल, राकेश जैन, रावलमल जैन, सुनील गोगड, जितेंद्र टाटीया, भावेश जैन, दिनेश जैन, अशोक जैन, कमलेश जैन, पियुष जैन, मदन जैन, मदनलाल बुरड, नितीन बुरड, अंनिसचे सुभाष जगताप, विशाल गागुर्डे, राजेद्र गवळी, मोतीलाल पोतदार, मुस्लिम समाज अध्यक्ष अल्ताफ एन. सैय्यद आदींनी सहभाग नोदविला.