देसाई यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0

पुणे : मारहाण तसेच जातीवाचक टिपण्णी केल्याच्या प्रकरणात भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई व त्यांच्या पतीसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश ए. के. पाटील यांनी हा आदेश दिला.

तृप्ती देसाई, त्यांचे पती प्रशांत नारायण देसाई, दीर सतिश नारायण देसाई व भूमाता ब्रिगेड संघटनेचे कार्याध्यक्ष कांतीलाल ऊर्फ अण्णा गवारे (सर्व रा. पुणे) यांचे जामीन न्यायालयाने फेटाळले आहेत. या प्रकरणाची तक्रार विजय अण्णा मकासरे (वय 33, रा. श्रीरामपुर, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली होती. 27 जून रोजी सकाळी बालेबाडी स्टेडीयम येथील महामार्गावर ही घटना घडली. तृप्ती देसाई यांनी त्यांच्याकडील 27 हजाराचा ऐवज लूटला. तसेच जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारी म्हटले होते. या प्रकरणी गुन्हा हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. कलम 18 नुसार आरोपीविरुद्ध काही आरोप असतील तर त्यांना जामीन देता येत नसल्याचे सरकारी वकील विलास घोगरे यांनी न्यायालयाला सांगितले.