शिरपूर- शहरातील श्यामनगर भागातून मंगळवारी सकाळी वेश्या व्यवसाय करणार्या आठ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी काही महिला पळून जाण्यात यशस्वी झाल्या. यापूर्वी करवंद नाका ते शहराकडे येणार्या रस्त्यावरील श्यामनगर भागात वेश्या व्यवसाय करणार्या महिलांची वसाहत होती. त्यामुळे तेथे राहणार्या नागरिकांनी आंदोलन केले होते. त्यांनतर ही वसाहत उदध्वस्त करण्यात आली. मात्र या भागात पुन्हा वेश्या व्यवसाय सुरू झाला होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास या भागात पोलिसांनी छापा टाकून आठ महिलांना ताब्यात घेतले.