देहुमध्ये स्वच्छता अभियान, पाच ट्रक कचरा उचलला

0

देहु : माजी नगरसेवक दत्तात्रय पवळे यांच्या संकल्पनेतून दिवंगत महापौर मधुकररावजी पवळे प्रतिष्ठान व जय बजरंग तरूण मित्र मंडळ निगडी गावठाण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी 5 ट्रक कचरा उचलण्यात आला. देहू येथील तुकाराम महाराज मंदिराजवळील इंद्रायणी नदीच्या घाटावर सकाळी 6 ते 11 या वेळेत हे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

अभियानात यांचा सहभाग…

यावेळी, देहुचे माजी उपसरंपच बाबा भालेकर, माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके, लहु धुमाळ, रोहित खर्गे, दिलीप शिंदे, कालिदास केंदळे, प्रदीप पडवळ, मारुती चौगुले, बाळा मोरे, सतीश झेंडे, राजेंद्र चौधरी, राजू सावंत, शेखर चव्हाण, नितीन माने आदींनी घाटाची स्वच्छता केली.