देहूरोड : देहूरोड परिसरात पारंपारिक दहीहंडीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ढाकुम..माक्कुम च्या तालावर गोविंदांनी दही-लोणी चाखले. यावर्षी सर्वच मंडळांनी ध्वनीक्षेपकाच्या आवाजाची मर्यादा राखत सोहळा साजरा केल्याचे दिसुन आले. देहूरोड परिसरात अनेक वर्षे बंद पडलेला दहीहंडीचा उत्सव यावर्षी मात्र, मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक मंडळानी सिनेतारकांना सोहळ्यासाठी बोलवले होते. सागर लांगे मित्र परिवारच्यावतीने तीन लाख 33 हजार 333 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. बाजरपेठेतील पंडीत जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयाच्या पटांगणात झालेल्या या कार्यक्रमात धारावी (मुंबई) येतील शास्त्रीनगर गोविंदा पथकाने सहा थर लावून ही हंडी फोडली.
शितळानगर येथे अमोल नाईकनवरे यांच्यावतीने दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. पाच थर लावून ही हंडी फोडण्यात आली. श्रीकृष्ण नगर येथे दहिहंडीचे आयोजन करण्यात आले होते. किवळे, दत्तनगर, मामुर्डी येथेही दहिहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.