देहूरोड : देहु आणि देहूरोड परिसरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध तरुण कार्यकर्त्यांकडून दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यक्रमात बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल उर्फ जिंकी खंडेलवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत सानप, बोर्ड सदस्य रघुविर शेलार, सारिका नाईकनवरे, हाजीमलंग मारिमुत्तू, गोपाल तंतरपाळे, ललित बालघरे, अॅड. अरूणा पिंजण तसेच कार्यालय अधिक्षक श्रीरंग सावंत, व सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. राजू गुरव यांनी सूत्रसंचालन केले.
विकासकामांची माहिती दिली
मुख्य कार्यकारी अधिकारी सानप यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी खंडेलवाल यांनी बोर्डाच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. मागील अडीच वर्षांत विद्यमान सदस्यांना कामे करण्याची संधी तब्बल एक वर्षाने मिळाली. तांत्रिक कारणांमुळे पहिल्या वर्षात एकही काम करता आले नव्हते. चार महिने मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त होते. मात्र, मागील एक वर्षात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत, असे खंडेलवाल यांनी सांगितले. सध्या 20 कोटींची कामे पूर्ण झाली असून येत्या काही काळात आणखी 35 कोटींची कामे करण्यात येणार असल्याचे खंडेलवाल यावेळी म्हणाले.
बाजारपेठेतील सुभाष चौकात देहूरोड बाजार कमिटीच्यावतीने ध्वजारोहणाचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. सत्यजीत वाढोकर यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी बाजार कमिटीचे सचिव मदन सोनिगरा, यदुनाथ डाखोरे, अॅड. कृष्णा दाभोळे, अॅड. कैलास पानसरे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य रघुविर शेलार, हाजीमलंग मारिमुत्तू, रेणू रेड्डी, दिनेश श्रीवास, सुरेश लांगे, अजय लांगे, गुरमितसिंग रत्तू, इंद्रपालसिंग रत्तु, गंगुताई खळेकर, सुशिला नरवाल, मोल नाईकनवरे, उध्दव शेलार, उमेश जैन आदी उपस्थित होते. डॉ. रमेश बन्सल कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. श्री शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य शितोळे, शिक्षक आणि विद्यार्थी-विद्याीर्थनींचे पथक यावेळी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात हनिफ शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. नवशक्ती चैतन्य मंडळाच्या कार्यक्रमात विशाल खंडेलवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुनिल लांगे, विजय लांगे, बाळासाहेब फाले, किरण भारस्कर, दयाल सिंधवाणी आदी उपस्थित होते. उपस्थितांना सन्मनित करण्यात आले.
गांधीनगर येथे हाजीमलंग मारिमुुत्तू यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. आंबेडकरनगर येथे उमेश ओव्हाळ यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. कैलाश गोरवे, फारूख कुरेशी, आरिफ कुरेशी, कामगार नेते बाळासाहेब झंजाड, मीना केदारी, गंगुताई खळेकर. सरस्वती पिल्ले आदी उपस्थित होते. शितळानगर येथे बोर्ड सदस्या सारिका नाईकनवरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एम. बी. कॅम्प, श्रीकृष्ण नगर, पारशीचाळ, पोर्टरचाळ, मामुर्डी विकासनगर येथे विविध मान्यवरांच्याहस्ते ध्वजारोहन कार्यक्रम झाले.
देहूरोड धम्मभूमी येथे बुध्दविहार कृती समिती, बुध्दविहार ट्रस्ट, धम्मभूमी सुरक्षा समिती आणि दम्मभूमी महिला संघटनेच्यावतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंजनाताई सोनवणे यांच्याहस्ते ध्वजारोहन झाले. टेक्सास गायकवाड, अॅड. गुलाबराव चोपडे, प्रकाश कांबळे, सुमेध भोसले आदी उपस्थित होते. देहु येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजवंदन करण्यात आले. सरपंच सुनिता टिळेकर यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले.