देहूरोड-चिंचवड लोहमार्ग ब्लॉक

0

देहूरोड : देहूरोड ते आकुर्डी व आकुर्डी ते चिंचवड या रेल्वे स्थानकांदरम्यान रविवारपर्यंत (दि. 2) रेल्वे ट्रॅकच्या देखभाल-दुरुस्तीकरिता दुपारी तीन तासांचा ब्लॉक ठेवण्यात आला आहे. यामुळे दुपारी 1 वाजता पुण्यातून सुटणारी पुणे-लोणावळा लोकल चिंचवड स्थानकापर्यंतच धावेल. तर लोणावळ्याहून दुपारी 2 वाजता सुटणारी लोकल चिंचवड स्थानकावरुन पुण्याच्या दिशेने धावणार आहे. तर एलटीटी-कराईकल एक्स्प्रेस शनिवारी (दि. 1) देहूरोड स्थानकावर 22 मिनिटे थांबविण्यात येणार आहे. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.