देहूरोड : मित्रांसोबत गणपती मंडप काढणार्या एका तरुणाला दुचाकीवरून आलेल्या चौघांनी काहीएक कारण नसताना मारहाण केली. मारहाणीत तरुणाच्या डाव्या हातावर तलवारीने वार करण्यात आल्याने तो जखमी झाला आहे. ही घटना देहूरोड परिसरातील शिवाजीनगरात बुधवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास घडली.
रमेश विष्णू दांगट (वय 37, रा. दांगड वस्ती, शिवाजीनगर, देहूरोड) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रमेश याने दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणार्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश, डुंगा, त्याचे दोन मित्र (नाव, पत्ता माहिती नाही) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास देहूरोड पोलीस करत आहेत.