लुणावत परिवाराने राबविला उपक्रम
देहूरोड-स्वतःचे आयुष्य जगताना समाजासाठीही थोडे योगदान हवे, या जाणीवेतून गेली 29 वर्षे विविध माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविणार्या लुणावत परिवाराच्यावतीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावर्षी दिवंगत स्वातंत्र्य सेनानी बन्सीलाल लुणावत, विजयलक्ष्मी अगरवाल आणि अंजली सोनटक्के यांच्या स्मरणार्थ या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य गोपाल तंतरपाळे अध्यक्षस्थानी होते. बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सदस्य ललित बालघरे, रघूविर शेलार कार्यालय अधिक्षक श्रीरंग सावंत, पिंपरी-चिंचवडच्या नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, सामाजिक कार्यकर्ते शाम भोसले, यदुनाथ डाखोरे, मिकी कोचर, तुकाराम भोंडवे, नरेंद्र महाजनी, परविन अगरवाल आदी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गरजु विद्यार्थ्यांना वह्यावाटप करण्यात आले. मान्यवरांची भाषणे झाली. मुलांनी खूप अभ्यास करावा, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे. कुठल्याही अडचणीवर मात करण्याची तयारी ठेवावी. ॠमाजातून देणार्या हातांची कमतरता भासत नाही, असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. सुरेश लुणावत यांनी प्रस्ताविक भाषण केले. प्रतिक लुणावत, सुनिता लुणावत, निखील शिंदे, निर्मल गेहलोत, अविनाश गाडे, दशरथ दातीर, आनंदा वाळके, राजू साळवे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.