भुसावळ- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत प्रथम फेरीत फार्मसी कॉलेज फैजपूरचा 113 धावांचा पाठलाग करून 17 षटकात सहा गडी राखून पराभव केला. त्यानंतर दुसर्या फेरीत विधी महाविद्यालय जळगांवच्या 154 धावांचा पाठलाग करून 10.2 षटकात आठ गडी राखून पराभव करण्यात आला. या सामन्यात योगेश तेलंगने सात षटकार, सात चौकार, 35 चेंडूत 79 धावा, विवेक मेहराने तीन षटकार, सात चौकार मारून 20 चेंडूत 48 धावा केल्या. या खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळीमुळे तिसर्या फेरीत प्रवेश मिळाला. पुढील सामना नाहाटा महाविद्यालयाशी रंगणार आहे. या स्पर्धा फैजपूरातील डी.एन.कॉलेजच्या मैदानावर सुरू आहेत. खेळाडूंचे प्रा.डॉ.आनंद उपाध्याय, डॉ.नवनीत आसी, प्रा.सचिन झोपे, प्रा.डॉ.श्रीकृष्ण बेलोरकर, प्रा.डॉ.गोविंद मार्तडे यांनी अभिनंदन केेले. खेळाडूंना प्रा.डॉ.संजय चौधरी यांचे मार्गदर्शन केले.