भुसावळ । येथील दे.ना. भोळे महाविद्यालयातील प्राध्यापिका प्रा.डॉ. भारती बेंडाळे यांच्या प्राचीन मराठी संत कवयित्री या पुस्तकाचे प्रकाशन उमवि कला विभागाचे माजी अधिष्ठाता प्रा.डॉ. शिरीष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. आर.पी. फ ालक, विभागप्रमुख प्रा. एस.व्ही. बाविस्कर, प्रा. महेंद्र सोनवणे, प्रा. एस.डी. चौधरी उपस्थित होते.
यांची होती उपस्थिती
प्रकाशन सोहळ्याच्या यशस्वीतेकरीता प्रा. दयाधन राणे, प्रा. अनिल सावळे, प्रा.डॉ. जगदिश चव्हाण, प्रा.डॉ. आर.एम. सरोदे, प्रा.डॉ. आर.बी. ढाके, प्रा.डॉ. जी.पी. वाघुळदे, प्रा. श्रेया चौधरी, प्रा.डॉ. जयश्री सरोदे, प्रा. संगिता धर्माधिकारी, प्रा. रोहित तुरकेले, प्रा. अनिल नेमाडे, प्रा. एस.एस. पाटील, रणजित राजपूत, प्रा. एस.डी. चौधरी, निलेश तायडे आदींनी
परिश्रम घेतले.