भुसावळ- शहरातील दे.ना.भोळेे महाविद्यालयात चॉईस बेस क्रिडिट सिस्टीम
अभ्यासक्रम पध्दतीवर एक दिवसीय कार्यशाळा झाली. मुक्ताईनगरच्या जी.जी.खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही.आर.पाटील यांनी उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, आयक्यू ए.सी.समन्वक प्रा.अंजली पाटील, प्रा.डॉ.जी.पी.वाघूळदे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रथम सत्रात प्राचार्य व्ही.आर.पाटील यांनी शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित पाहिजे असल्याचे सांगत विषयाच्या आवडी निवडीने शिक्षण घेतले गेले पाहिजे त्यासाठी यु.जी.सी.ने चॉइस बेस क्रेडिट सिस्टिम अभ्यासक्रम पद्धत लागू केली असल्याचे सांगितले. द्वितीय सत्रात प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, कार्यशाळेचे उद्दिष्ट असे की, सर्व फॅकल्टी मेंबर यांना सदर सिस्टिमची माहिती व्हावी. ईतर विद्यापीठात व जगभरात कुठेही विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना क्रेडीट पॉईंट चा फायदा होऊन प्रवेश मिळेल व त्याला पदवी प्राप्त होईल व विशेष स्तर विषयासोबत आवडीनुसार इतर विषय पसंत करून अभ्यास करता येईल. तृतीय सत्रात प्रा.डॉ.जी.पी.वाघुलदे यांनी उच्च शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांना पसंती नुसार शिक्षण मिळावे व सर्व भारत भर विद्यापीठात अभ्यासक्रमात सारखेपणा यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यांनी घेतले परीश्रम
प्रसंगी प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्याथी उपस्थित होते. प्रा.अंजली पाटील, प्रा.डॉ.कांता
भाला, प्रा.अनिल सावळे, प्रा.डॉ.शोभा चौधरी, प्रा.आर.बी.ढाके, प्रा.अनिल नेमाडे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.दीपक जैस्वाल, प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.डी.एस.राणे, प्रा.डॉ.एस.डी.चौधरी, महेश कोरहळकर, सुधाकर चौधरी, सुनील ठोसर यांनी परीश्रम घेतले. प्रस्तावना प्रा.जी.पी.वाघुलदे तर सूत्रसंचालन प्रा.कांता भाला तसेच आभार प्रा.अंजली पाटील यांनी मानल्याचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.डॉ.एस.डी.चौधरी कळवतात.