दैनिक ‘जनशक्ति’च्या खान्देश आवृत्तीचा स्नेहमेळावा

0

जळगाव। दैनिक जनशक्तिच्या खान्देश ( जळगाव, धुळे, नंदूरबार) आवृत्ती परिवाराचा स्नेहमेळावा आज मुख्य संपादक व सिध्दीविनायक उद्योग समुहाचे चेअरमन कुंदन ढाके यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पत्रकार संघाच्या स्व. भंवरलाल जैन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या स्नेहमेळाव्याचा प्रारंभ दैनिक जनशक्तिचे संस्थापक-संपादक स्व. ब्रिजलाल (भाऊ) पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन झाला. या मेळाव्याचेे प्रास्ताविक व खान्देश आवृत्तीच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा कार्यकारी संपादक शेखर पाटील यांनी मांडला. त्यानंतर उल्लेखनीय कामगिरीबद्दल दैनिक जनशक्ती परिवारातील प्रतिनिधींचा गौरव मुख्य संपादक कुंदन ढाके यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला.

सन्मानाचे मानकरी प्रतिनिधी
रतीलाल देसले (एरंडोल, उत्कृष्ट वार्तांकन ), अमोल पाटील ( अमळनेर, उत्कृष्ट राजकीय वार्तांकन), ज्ञानेश्‍वर थोरात ( धुळे, वितरण), चेतन चौधरी व अभिजीत आढाव ( भुसावळ , वार्तांकन व जाहिरात व्यवसाय), विलास अहिरे (शेंदुर्णी, ता- जामनेर; उत्कृष्ट वार्तांकन- ग्रामीण), रवींद्र चव्हाण (उत्कृष्ट वार्तांकन, नंदुरबार), विलास पाटील ( चोपडा, जाहिरात व्यवसाय), प्रेमेंद्र पाटील (नवापूर, जिल्हा नंदुरबार- वार्तांकन), भरत शर्मा (शहादा, जिल्हा नंदुरबार , वार्तांकन ), मुराद पटेल ( चाळीसगाव विभागीय कार्यालय; उत्कृष्ट समन्वय), सुर्यकांत कदम( ×उत्कृष्ट वार्तांकन, चाळीसगाव), राजेंद्र पाटील( शिरपूर, जिल्हा- धुळे), शालीक महाजन ( रावेर, उत्कृष्ट वार्तांकन) हे यंदाच्या सन्मानाचे मानकरी ठरले. या स्नेहमेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्य संपादक व सिध्दीविनायक उद्योग समुहाचे चेअरमन कुंदन ढाके, उपाध्यक्ष सूनील झांबरे, महाव्यवस्थापक किरण चौधरी, कार्यकारी संपादक शेखर पाटील, व्यवस्थापक एस. आर. पाटील, वृत्तसंपादक विकास पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन लेवाशक्तीचे वरिष्ठ उपसंपादक तुषार वाघुळदे यांनी केले, आभार व्यवस्थापक एस.आर. पाटील यांनी मानले.