पुणे-दैनिक जनशक्तीच्या माध्यम सल्लागारपदी दिल्ली येथील प्रा.डॉ.राजेश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दैनिक जनशक्तीचे मुख्य संपादक कुंदन ढाके यांनी त्यांची नियुक्ती केली आहे. आज बुधवारी २३ जानेवारी रोजी त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. प्रा.डॉ.राजेश शर्मा हे नवी दिल्लीतील रहिवासी आहे. त्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातील दीर्घ अनुभव आहे. त्यांनी ‘एमएसएमई’मध्ये संचालक म्हणून कामकाज पाहिलेले आहे. भाजपचे राष्ट्रीय संयोजक म्हणून देखील त्यांनी कामकाज केलेले आहे. ते भाजप हिमाचल प्रदेशचे कार्यकारिणीचे प्रमुख होते.