दोंडाईचा : शहराजवळील केशरानंद जिनिंगमधील ऑईल मिलला शनिवार, 23 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने सुमारे 80 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीची माहिती कळताच दोंडाईचा व शिंदखेडा अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
लाखोंची सरकी खाक
बाम्हणे-दोंडाईचा रस्त्यावर केशरानंद जिनिंग असून या जिनिंगमधील आईल मिलला भीषण आग लागल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. आगीनंतर दोंडाईचा, शिंदखेडा-वरवाडे नगरपरीषदेच्या अग्निशमन दलाने धाव घेतली. अग्निशामक दलाच्या कर्मचार्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले मात्र तो पर्यंत मोठ्या प्रमाणावर सरकी खाक झाली तर ऑईल मिलच्या चौदा मशीनपैकी अनेक मशिनी जळून खाक झाल्या.
80 लाखांच्या नुकसानीचा अंदाज
घटनेची माहिती मिळताच केशरानंद उद्योग समूहाचे संचालक ज्ञानेश्वर आबा भामरे, केशरानंद जिनिंगचे संचालक शिवराज भामरे घटनास्थळी दाखल झाले. या आगीत अंदाजे 80 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.