धुळे – जिल्ह्यातील दोंडाईचा पालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत 2 आॅगस्टला होणार आहे. मात्र, पर्यटनमंत्री जयकुमार रावल हे श्रेय लाटत असून काॅंग्रेस आघाडीने दिलेल्या निधीतून दोंडाईचा पालिकेची इमारत साकारल्याचे रावलांचे विरोधक सांगत आहे. काॅंग्रेस नेते व माजी मंत्री डाॅ.हेमंत देशमुख, जिल्हाध्यक्ष शामकांत आदींसह कार्यकर्त्यांनी आज दोंडाईचा येथे परस्पर पालिकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन केले.