दोंडाईचा । येथील नगरपालिकेच्या प्रशासकिय इमारतीसाठी पूर्वी 3.60 कोटी निधी मंजूर होता, त्यातून सदर इमारतीचे काम प्रगतीपथावर होते, परंतु एवढया कमी निधीतून इमारत तयार होण्यास अडचण निर्माण होणार होती, म्हणून वैशिष्टयपूर्ण योजनेतून पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी नव्याने 4 कोटी 80 लाखाचा निधी आणून इमारतीत मोठे फेरबदल करत पुढच्या 70 वर्षाचा विचार करून ही भव्य वास्तू साकारली जात आहे, याची पाहणी मंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्षा नयनकुंवर रावल सर्व सभापती व नगरसेवकांनी केली.
रावल यांच्याकडून पाहणी
पालिकेत पुन्हा सत्तांतर झाले आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या गटाकडे सत्ता आली. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी पालिकेच्या इमारत भव्य आणि प्रशस्त व्हावी म्हणून इमारतीत अनेक मोठे फेरबदल केले. पुर्वीची 3 कोटी 60 लक्ष रूपये किंमतीची इमारतीसाठी नव्याने 4 कोटी 80 लक्ष रूपये मंजूर करून तब्बल 8 कोटी 40 लक्ष लाखाचा प्लॉन तयार करण्यात आला आहे. त्यातून अदयावत अशी पालिकेची इमारत साकारण्यात येणार असून या कामाची पाहणी नुकतीच मंत्री जयकुमार रावल यांच्यासह पदाधिकार्यांनी केली.
पदाधिकार्यांची उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष नयनकुंवर रावल, उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, बांधकाम सभापती संजय मराठे, पाणीपुरवठा सभापती करणसिंह देशमुख, नगरसेवक निखील राजपूत, चिरंजीवी चौधरी, शहादा पालिकेचे नगरसेवक रविंद्र जमादार, माजी विरोधी पक्षनेता प्रविण महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष संजय तावडे, कृष्णा नगराळे, नरेंद्र गिरासे, जितेंद्र गिरासे, खलील बागवान, भाजपाच्या जिल्हाध्यक्षा चंद्रकला सिसोदिया, ईस्माईल पिंजारी, जोहरा शाह, पालिकेचे अभियंता शिवनंदन राजपूत, ठेकेदार दिक्षीत, यांच्यासह शहरातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
विशेष निधी वाढवला
सन 2001 ते 2006 या काळात पालिकेची सत्ता मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे असतांना पालिकेच्या इमारतीसाठी निधी मंजूर करून आणला होता. जुन्या कॉटेज हॉस्पीटल येथे मध्यवर्ती ठिकाणी नियोजित होती. या इमारतीच्या मागे अमरावती नदीत बगीचा पार्किंगसाठी जागा असा सुंदर प्लॉन तयार केला होता.
नंतरच्या काळात पालिकेत सत्तांतर झाल्यानंतर पालिकेची इमारतीसाठी असलेला निधी वर्ग करून दुसरी कामे त्यात करण्यात आली. मागील सत्ताधार्यांनी अत्यंत अडचणींच्या ठिकाणी नविन इमारतीचे बांधकाम सुरू केले. इमारत बांधकामासाठी 2 ते 3 कोटीचा खर्च देखील करण्यात आला.