२०१५ साली मिळाली मंजूरी ; २०१६ साली प्रत्यक्ष कामाला सुरूवात
पोलीस महासंचालकांद्वारे ५० लाखांचा निधी ; अडीच एकर जागेत बांधकाम
शहादा । येथील दोंडाईचा रस्त्यांवर भेंड्वा नाल्याजवळ नवीन पोलीस स्टेशनच्या इमारतीचे काम पूर्णत्वास आले असून इमारतीच्या लोकार्पण सोहळा हा चांगल्या मुर्हताच्या प्रतक्षेत आहे. हा मुहूर्त २ आक्टोंबर महात्मा गांधीजीच्या जयंतीला मिळण्याची शक्यता सुत्रांकडून वर्तविले जात आहे. शहादा पोलीस स्टेशनची जुनी इमारत ही ब्रिटिशकालीन असून बसस्थानक शेजारी तहसिल कार्यालयाला लागुन आहे. गेल्या अनेक वर्षांपासुन नवीन इमारतीबाबत पाठपुरावा होता. शेवटी इमारतीचे काम मंजुर होवून बांधकाम पुर्ण झाले आहे. नवीन इमारत अद्यावत स्वरूपाची बांधण्यात आली आहे.
जुन्या इमारतीत गैरसोय
या नवीन पोलीस स्टेशन इमारतीत एकुण ११ खोल्या आहेत यापैकी तीन खोल्या ह्या कैदीच्या लॉकअपसाठी बनविल्या आहेत. स्री पोलीस अधिकार्यांसाठी तीन खोल्या वेगळ्या असुन महिलांसाठी स्वतंत्र विभाग आहे. यासाठी १५ लाख रु . खर्च केले आहेत. इमारतीचा आवारात काँक्रीटीकरण करण्यात आले आहे . जुनी इमारत तहसील कार्यालयाला लागून असल्याने तेथे नागरीक व वाहनाची गर्दी होत असे. पोलीस कर्मचार्यांना अक्षरशः जागा अपूर्ण पडत असे.
परेड मैदानाची सोय
पोलीस स्टेशनचा इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत करण्यात आले आहे. बांधकामाचा ठेका नाशिक येथील सुचिंतन डेव्हलपरला दिला आहे. या बांधकामासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा निधी पोलीस महासंचालक मुंबईकडून मंजुर झाला आहे. सुमारे अडीच एकर जागेत बांधकाम केले असून त्यात पोलीस परेड मैदानाची सोय दोन एकरात करण्यात आली आहे. सन २०१२ मध्ये इमारतीबाबत प्रस्ताव दाखल केला होता. २०१५ -१६ मध्ये मंजुरी मिळवून प्रत्यक्ष एक मार्च २०१६ रोजी कामाला सुरुवात झाली होती.
२ ऑक्टोंबरला लोकार्पण ?
नवीन इमारतीत तालुका पोलीस स्टेशन असणार असुन जुन्या इमारतीत शहर पोलीस स्टेशन किंवा डिवायएसपी कार्यान्वित केले जाईल असा अंदाज आहे. पोलीस वहातुक विभाग हा जुन्या इमारतीत राहिल. आता नवीन पोलीस स्टेशनचा लोकार्पण सोहळा कधी व कोणाच्याहस्ते होतो याकडे लक्ष लागले आहे. अधिक माहिती मिळविली असता २ ऑक्टोबर रोजी लोकार्पण सोहळा होइल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.