दोंडाईचा येथील हस्ती स्कूलच्या फेन्सिंगपटूंचे यश

0

नाशिक येथे झाली मिशन ऑलिम्पीक २०२४ चॅम्पीयनशिप स्पर्धा

दोंडाईचा । १६ व १७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे संपन्न झालेल्या मिशन ऑलिम्पीक २०२४ ऑल महाराष्ट्र स्टेट फेन्सिंग चॅम्पीयनशिप स्पर्धेत हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅण्ड ज्यु.कॉलेज-दोंडाईचा येथील फेन्सिंगपटूंनी सहभाग नोंदविले होते. स्पर्धा के.एन.डी.बहुउद्देशिय मंडळ व महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.

पदक देऊन गौरव
या स्पर्धेच्या १४ वर्ष वयोगटातील योगेश अठावाल (सुवर्णपदक), कानन जैन (रजत पदक) पूर्वा पवार (रजत व कांस्य पदक) प्राप्त केले. यास्तव पूर्वा पवार हिची आगामी ग्वाल्हेर येथे संपन्न होणार्‍या राष्ट्रीय पातळीवरील फेन्सिंग स्पर्धेकरिता स्तुत्य निवड करण्यात आली. फेन्सिंगपटूंना शाळेचे फेन्सिंग कोच विशाल पवार व धुळे जिल्हा फेन्सिंग असोसिएशन सचिव कैलास कंखरे यांचे मार्गदर्शन लाभले. हस्ती स्कूल नियमितपणे अशा स्वरुपाच्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होणे प्रेरित करते.