दोंडाईचा येथे विद्यार्थीनींची अनोखी राखी पोर्णिमा

0

दोंडाईचा । हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती पब्लिक स्कूल अ‍ॅन्ड ज्यु.कॉलेज येथील हस्ती लिओ क्लब एंजल्सतर्फे रक्षाबंधन उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. या दिवशी लिओ क्लब एंजल्सच्या विद्यार्थीनींनी स्वत: तयार केलेल्या राख्या घेवून दोंडाईचा शहरातील बसस्थानक, रेल्वेस्थानक व पोलिस स्टेशन याठिकाणी गेल्या. तेथे आपल्या सेवा कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी व अधिकारी बांधवांना याविद्यार्थीनींनी राख्या बांधल्या. रक्षाबंधन सणाला बहिणभावाकडे राखी बांधायला किंवा भाऊबहिणीकडे राखीबांधून घ्यायला जातात.

हस्ती स्कूल्सच्या विद्यार्थीनींचा उपक्रम
यादिवशी राखीच्या पवित्रधाग्याने भाऊ, बहिणींचे रक्षण करण्यासाठी बांधला जातो. या उत्त्सवाला बहिण-भावाला-आणकरण्याची सेवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे वाहक-चालक पुरवितात. पंरतू हे प्रवाशांचे सेवेकरी तसेच रेल्वेस्थानक व पोलिसस्टेशनवर आपले सेवा कर्तव्य बजावणारे कर्मचारी, अधिकारी यासणाला बहिनींना भेटू शकत नाहीत, याची खंत त्यांना असते. यास्तव हस्ती स्कूल लिओ क्लब एंजल्सच्या विद्यार्थीनींनी आपल्या शिक्षक-शिक्षिकांच्या मदतीनेवरील तिन्ही ठिकाणांना भेटी देवून, वाहक-चालक, कर्मचारी, अधिकारीर्‍यांना राख्या बांधल्या. याप्रसंगी सर्वविद्यार्थीनींना वाहक-चालक आणि उपस्थित कर्मचारी व अधिकार्‍यांनी मिठाई,चॉकलेट व रक्षाबंधनाची भेट देवून कौतुक केले. लिओ क्लब एंजल्स अध्यक्षा पुर्वा पवार, कृतिका पवार, युक्ती अठावाल तसेच दिव्या शिंदे, तितिक्षा कोठारी, खुशी शर्मा, रिद्धी गाडेकर, निधी जैन तसेच लिओ क्लब मार्गदर्शक शिक्षक मनोज ठाकूर, प्रविण गुरव हे सहभागी
झाले होते.