शिंदखेडा । बालविकास प्रकल्प अधिकारी धुळे यांच्या अंतर्गत येणार्यां दोंडाईचा येथील सर्व 9 अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनिस यांची शनिवार 29 जुलै रोजी सकाळी 11:00 वाजता महादेवपुरा येथील अंगणवाडी क्र. 160 येथे तातडीची बैठक घेण्यात आली.
बैठकीत लेखी आचार संहीता सर्व सेविकांना व मदतनीस यांना पर्यवेक्षीका एस. एम. चौरे यांनी दिली. त्यात अंगणवाडी सेविकांनी गणवेशात येणे व नियमित सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हजर राहाणे , सेविका व मदतनीस यांनी आहाराची चव घेणे नंतर मुलांना वाटप करणे आदी सूचना देण्यात आल्या. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमूख शानाभाऊ सोनवणे यांनी अंगणवाडीतील मूलांना निकृष्ठ पोषण आहार देण्यात येतो अशी तक्रार केली होती,त्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती.शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी काल पून्हा अंगणवाडी क्रमांक 160मध्ये जावून दिल्या जाणार्या पोषण आहाराची पाहणी केली. आहाराच्या प्रतीत सुधारणा झाल्याचे आढळून आले. यावेळी पर्यवेक्षीका एस . एम. चौरे यांनी घडलेला प्रकार योग्य नाही. यापूढे कोणत्याही अंगणवाडीत असा प्रकार घडणार नाही याबाबत वेळोवेळी पाहणी करण्यात येईल व काळजी घेण्यात येईल अशी ग्वाही दिली.