दोंडाईचा : शहरातील जुना शहादा रोड व दाऊळ रस्त्यावरील रेल्वे गेटमुळे ग्रामीण जनतेची मोठी अडचण होत असून या ठिकाणी रेल्वेने पर्यायी रस्ता करावा, या मागणीसाठी सोमवारी येथील रेल्वे स्थानकावर रेल रोको करण्यात आला. रेल्वे गेट कायमचे बंद करून अमरावती नदीच्या कोपर्याजवळ बोगदा तयार करून शहादा रोडसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मागणी करण्यात आली. ती मान्य न झाल्यास भविष्यात उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात पं.स. सदस्य शानाभाऊ सोनवणे, दाऊळचे उपसरपंच नरेंद्र भामरे, किरण पवार, भैय्या कोळी, संग्राम ठाकरे, गुलाब निकम, सुनील मगर, कुणाल माळी, दिगंबर माळी, लोटन देसले, कैलास ठाकूर, अनिल वाघ, संदीप भोई, शैलेश सोनार आदीसह कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.