दोंडाईचा शहरात आशिया खंडातील पहिलाच फूड अँड फार्मा स्टार्च प्रकल्प

0

दोंडाईचा । येथे शिवांगण फूड अँड फार्मा या आशिया खंडातील पहिल्या फूड अँड फार्मा स्टार्च उत्पादन करणार्‍या कंपनीच्या प्लान चाचणी चे उद्घाटन राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले सरकारसाहेब रावल आपल्याच मातीत हा उद्योग उभारून त्यांचे वडील सहकारमहर्षी दादासाहेब रावल यांच्या पावलावर पाऊल ठेवला आहे.

दादासाहेब रावल यांनी सन 1972 मध्ये युनिव्हर्सल स्टार्च या कंपनीची मुहूर्तमेढ दोंडाईचा शहरात केली होती शिंदखेडा सारख्या दुष्काळी भागात उद्योग उभारून येथील बेरोजगार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता आजही सरकारसाहेब रावल यांनी तोच प्रयोग केला असून शिवांगण फूड अँड फार्मा ही कंपनी पूर्णतः आटोमॅटिक असून दररोज या कंपनीद्वारे 125 ते 130 टन फूड अँड फार्मा स्टार्च उत्पादित केला जाणार आहे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील फूड अँड फार्मा क्षेत्रातील कंपनीला हा स्टार्च उपयोगी येणार आहे आज मंत्री जयकुमार रावल यांच्याहस्ते या कंपनीच्या प्लानच्या चाचणीचे उदघाटन करण्यात आले यावेळी सरकारसाहेब रावल , दोंडाईचा शहराच्या नगराध्यक्षा नयन कुंवर रावल, कंपनीचे चीफ ओपरेटिंग ऑफिसर राजेश परमार, शिवांगणचे डायरेक्टर अडमिनिस्ट्रेशन जी पी चौधरी, बेबीराणी वेदांतेश्वरीकुमारी रावल, बाबाराजा जयअदित रावल,बांधकाम सभापती संजय मराठे, नगरसेवक निखिल राजपूत,प्रवीण महाजन, यांच्यासह कंपनीचे विविध विभागाचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ना रावल म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी मेक इन महाराष्ट्र चा संकल्प केला आहे त्यातूनच दोंडाईचा सारख्या लहानश्या शहरात आशिया खंडातील पहिलाच फूड अँड फार्मा साठी लागणारा स्टार्च उत्पादित होईल ही मोठी अभिमानाची बाब आहे, धुळे जिल्ह्यात आगामी काळात 5 ते 7 राष्टीय महामार्ग आणि रेल्वे चे जाळे विणले जात आहे शिवाय तापी नदीवरील बॅरेज मुळे मुबलक पाणी देखील उपलब्ध होणार आहे म्हणून आगामी काळात उद्योगाची पंढरी म्हणून धुळे जिल्ह्याचे नाव घेतले जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला