दोंडाईचा शहरात धनुर्वात निर्जंतुकीकरणाची मोहिम

0

दोंडाईचा। उपजिल्हा रूग्णालय दोंडाईचा यांच्यावतीने शहरातील विविध शैक्षणीक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना ‘धर्नुवात निर्जंतुकीकरण’ मोहीम राबवुन त्यांना लस देण्यात आली. त्यात उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.ललितकुमार चंद्रे, के.डी.ईशी, नितीन चावरे, जयदीप कानडे, मंगलाबाई धनगर यांच्या वतीने शहरातील गर्ल्स हायस्कुल व डी.आर.बी.ओ.डी हायस्कुल येथील 10 ते 16 वर्ष वयोगटातील मुलामुलींना धर्नुवाताची लस तसेच जंतनाशक गोळ्या देण्यात आल्या.

गैरहजर विद्यार्थ्यांसाठी पुन्हा मोहिम राबविणार
पावसाळ्यात होणारे साथीचे आजार धनुर्वात व पोटातील जंतासाठी ‘अल्बेन्डाझोल’ व धर्नुवातासाठी टीटीची लस देण्यात आली. यात सुमारे 600 विद्यार्थ्यांना लसीकरण व जंतू-निर्जंतुकीकरण मोहीमेचा लाभ झाला. यावेळी डॉ.ललितकुमार चंद्रे यांनी या मोहीमेचा जास्तीत जास्त विद्यार्थांनी लाभ घ्यावा व आपल्या आरोग्याचे धर्नुवात व पोटातील जंतूपासुन रक्षण करण्याचे आवाहन केले. तसेच ज्या विद्यार्थांना आज लस घेता आली नाही किंवा आज शाळेत गैरहजर आहेत. त्यांच्यासाठी पुन्हा ही मोहीम राबविण्यात येणार आहे. असे डॉ.ललितकुमार चंद्रे यांनी स्पष्ट केले. डॉ.चंद्रे यांच्यावतीने शहरात या व अशा अनेक मोहीमा राबविल्या जात असल्याने शहरातील पालक, शिक्षक व नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.