दोंडाईचा । शहरातील टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी तसेच महिला व महाविद्यालयीन तरूणींची छेड रोखण्यासाठी दोंडाईचा पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक डिंगबर पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाची स्थापना केली. यात पो.कॉ.एस.एस.काळे, दिपिका वाघमोळे, संजना पावरा, नयना शेख, मोहीनी माळी, प्रियंका देवरे, कुमावत, पुजा सोनवणे, शुंभागी पाटील या महिला पोलीसांचा समावेश आहे.
टवाळखोरांवर राहणार नजर
दोंडाईचा शहरात महाविद्यालयीन तरूणींच्या छेडखाणीत वाढ होवु नये यासाठी निर्भया पथकाची स्थापना केली असुन शहरातील शाळा महाविद्यालयांसह, बस स्थानक व शहरातील मुख्य चौकात पथक नजर ठेवणार आहे. काही दिवसापासुन शहरात महिला व मुलींचे छेड काढन्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच मागील काही प्रकार पाहता निर्भया पथकाची स्थापना सहा.पोलीस निरीक्षक डिंगबर पाटील यांनी सांगितले.
निर्भया पथकाचे स्वागत
दोंडाईचा शहरात बाजारपेठ, रावल नगर चौफुली,एस.एस.व्ही.पी.एस.कॉलेज, बस स्थानक, नंदुरबार चौफुली या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर टवाळखोर उभे राहतात. येणार्या जाणार्या महिला व तरूणींची विशिष्ट प्रकारे शेरे बाजी करीत छेड काढतात तर शाळा महाविद्यालयात मधल्या सुटीत तरूणींची छेड काढली जाते. शहरातील पुर्व इतिहास व बालिकेवरीर लैगिंक अत्याचाराची घटना पाहता निर्भया पथकाचे सर्व स्तरातुन स्वागत केले जात आहे.
पथकाने केली पहाणी
पथकांतील कर्मचार्यांनी शहरातील सर्व शाळा महाविद्यालयात भेटी दिल्या व विद्यार्थिनींच्या समस्या व सूचना ऐकुन घेत कार्यवाही चालु केली आहे. या कार्यवाहीचा धसका अनेक सडक छाप मजनुनीं घेतली असुन घरचा रस्ता पकडला आहे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी पथकाला सहकार्य करण्याचे आवाहन सहा. पोलीस निरीक्षक डिंगबर पाटील यांनी केले आहे.