दोंडाईचा : शहरातील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा भामरे यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांनी दैनिक जनशक्तीशी बोलताना दिली. बुधवारी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास पाटील यांना अटक करण्यात आली असन गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत सात संशयीतांना अटक करण्यात आली आहे.