जळगाव । शिरसोली येथील वंदना रविंद्र महाजन या विवाहितेच्या चारीत्र्यावर संशय घेवून गावातील काही जणांनी मारहाण करून् तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. यात सदरील महिला मोठ्या प्रमाणावर भाजली गेली होती. त्यामुळे तिचा उपचारादरम्यान जिल्हा सामान्य रूग्णालयात मृत्यू झाला होता. यास कारणीभूत म्हणून शिरसोली येथील तीन महिलांना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली होती. एमआयडीसी पोलीसात 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील महिला अरोपी वर्षा बापू महाजन, रूपाली गोविंदा माळी आणि रेखा संतोष महाजन यांनी आज न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असता न्या. एस.जी.ठुबे यांनी आरोपींपैकी आरोपी रूपाली माळी या महिलेचा जामीन मंजूर केला असून उर्वरित दोघा महिलांचा जामीन फेटाळला आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. केतन ढाके यांना कामकाज पाहिले.