दोघांचा पैशांसाठी तगादा वाढल्याने अमळनेरात एकाची आत्महत्या : दोघांविरोधात गुन्हा

Suicide of one in Amalner For Money : Crime Against Two अमळनेर : शहरातील सिंधी हाऊसिंग सोसायटीतील तरुणाने पैशांच्या तगाद्याला त्रस होवून आत्महत्या केली. दिनेश ठाकूरदास पंजवाणी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून ही घटना बुधवारी दुपारी घडली. दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीच्या आधारे जितेंद्र चौधरी (पारोळा) व रुग्णवाहिका चालक महेश सैंदाणे (रा.जानवे, ता.अमळनेर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिठ्ठी लिहून केली आत्महत्या
मयत दिनेश पंजवाणी यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहेत. त्यात माझ्या मुलाचे दोन वर्षाचे शिक्षण बाकी असून माझ्या मित्रांनो आपण शक्य तेवढी मदत करावी, असे त्यात नमूद आहे. पैशांचा तगादा लावणार्‍या दोन जणांची नावेदेखील या चिठ्ठीत लिहिली आहेत. मैं दिनेश पंजवाणी अपने होश आवास मे लिख रहा हूँ. मैं बेरोजगार हो गया हूँ, मुझे कोई काम नही मिल रहा है और शर्म की बात है की मेरी बीबी काम करके घर चलायेगी, मुझे दो लोग पैसे के लिये बहोत तंग कर रहे है…जितू चौधरी, महेश सैंदाणे ये लोग मुझे धमकी दे रहे है और मेरे पास घर चलानेको पैसे नही है, ये दोनों को कहासे दु, इसलिए तंग होकर मैं आत्महत्या कर रहा हूँ, ये दोनो के मोबाईल नंबर मेरे मोबाईल मे है, असेही चिठ्ठीत नमूद आहे.