शिरपूर । तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घङल्या. तालुक्यातील शिगांवे येथील भाईदास शिवाजीभील (वय 55) यांनी कोणते तरी विषारी औषध सेवन केल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिसात मृत्यूची नोंद केली.
तेथे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मयताचा मुलगा राजू भाईदास भील यांनीदिलेल्या खबरी वरुन अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. दुसर्या घटनेत शहरातील किस्मत नगर भागातील शाईन शेख रशिद शेख(वय20) यामहिलेला प्रसुती साठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते तेथे तिला जास्त रक्तश्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला.याबाबत आफसाना शेख जमील शेख यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरी वरुन अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे.