दोघांची न्यायालयीन तर तिघांनी सुधारगृहात रवानगी

0

जळगाव । रामानंदनगर परिसरातील कोल्हेनगरातील उच्चभ्रू वस्तीतील अपार्टमेंटमध्ये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत कुंटनखाना सुरु असल्याचा प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला होता. याप्रकारानंतर बदनामी झाल्याने शिवाजीनगर तसेच कोल्हे नगरातील रहिवाश्यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. दरम्यान पाचही जणांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता तिन्ही पिडीत तरुणींची महिला सुधारगृहात तर संशयित तरुणी व तरुणाची कारागृहात रवानगी केली आहे.

अश्यांच्या पथकाने मारला होता छापा
कोल्हेनगरात एका प्रसिध्द सोसायटीत फ्लॅटमध्ये कुंटनखाना सुरु असल्याची माहिती रामानंदनगर ठाण्याचे पोलीस निरिक्षक बापू रोहम यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे यांना प्रकार कळविला. सांगळे यांच्याकडून वॉरंट मिळाल्यावर रोहम यांनी पोलीस उपनिरिक्षक भागवत पाटील, विश्‍वनाथ गायकवाड, वसंत बेलदार, संदीप महजान, प्रदीप चौधरी, महिला कर्मचारी सुवर्णा तायडे, निलोफर सैय्यद याचे पथक तयार केले. ग्राहक म्हणून एका जणाला पाठवले. त्यानंतर पथकाने छापा टाकला. त्यात संशयित सागर सुधाकर पाटील (वय-22, रा. शिवाजीनगर) हा एका तरुणीच्या मदतीने इतर तीन तरुणींना सोबत घेवून कुंटनाखाना चालविण्यात असल्याचे निष्पन्न झाले होते.

रामानंदनगर पोलिसांनी अटक केलेल्या सागरसह तरुणी व तीन्ही पिडीत तरुणींना रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पिडीत तरुणींना महिला सुधारगृहात ठेवण्याचे आदेशित केले आहे. तर सागरसह तरुणीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन्हीसंशयितांतर्फे रशिद पिंजारी यांनी जामीनअर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने तपासअधिकारी यांचा खुलासा मागविला असून त्यावर सोमवारी कामकाज होणार आहे.