कोलकाता : गायी चोरल्याच्या संशयावरून केलेल्या मारहाणीत दोन मुस्लिम तरूणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम बंगालच्या जलीपैगुडी जिल्ह्यातील धुपगुरी गावाजवळ रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
गायी चोरल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या जबर मारहाणीत हफीझुल शेख आणि अन्वर हुसैन या दोघांचा मृत्यू झाला. जमावाकडून झालेल्या बेदम मारहाणीनंतर दोघांना रूग्णालयात नेण्यात आले होते, पण मात्र उपचार सुरू करण्यात आधीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले