दोघांना अटक; 3 पिस्तूल व 2 काडतुसे जप्त

0

पुणे । खंडणीविरोधी पथकाने विक्रीसाठी आणलेल्या तीन गावठी पिस्तूल आणि दोन काडतुसांसह दोघांना जेरबंद केले. ही कारवाई हडपसर शेवाळवाडी येथे 10 नोव्हेंबर रोजी करण्यात आली.धिरेंद्रकुमार सिंह (वय-25) आणि पंकजकुमार सिंह (वय-47) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही बिहार राज्यातील आहेत. त्यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नाईक प्रदीप शिंदे यांना दोघे जण शेवाळवाडी येथे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता पिस्तूल आणि काडतुसे आढळली. त्यानतर त्यांना अटक करण्यात आली.ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलीस कर्मचारी एकनाथ कंधारे, प्रदीप शिंदे, शिवाजी घुले, रमेश गरूड यांनी केली.