पहूर : तालुक्यातील पहूर येथून जवळच असलेल्या बालाजी पेट्रोलपंपाजवळ काल मध्यरात्री झालेल्या कारचा अपघात पाहण्यासाठी गेलेल्या दोघांना चारचाकीने धडक दिल्याने त्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर, दुसरा गंभीर जखमी आहे. येथून एक कीलो मिटरच्या अंतरावर असलेल्या औरंगाबाद-भुसावळ महामार्गावर बालाजी पेट्रोलपंप आहे. तेथे नंदु शशिकांत पाटील (वय-51) व गोकुळ चव्हाण (वय-22) हे दोघे येथे कामाला आहेत. काल रात्रीची त्यांची ड्युटी होती. नेहमीप्रमाणे ते कामावर गेले. पेट्रोलपंपासुन जवळच चारचाकी पलटी झाल्याची माहीती मिळाली, तेथे दोघे दुचाकीने अपघातस्थळी गेले.