दोघांना न्यायलयीन कोठडी

0

पुणे । परकीय चलनाची तस्करी करणार्‍या महिलेसह दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दुबईकडे निघालेल्या या दोघांना पुणे विमानतळावर अटक करण्यात आली होती. निशांत विजय येटम (नागोठणे, जि.रायगड) आणि हर्षा रंगलाणी राजू (मुंबई) अशी आरोपींची नावे आहेत. पुणे विमानतळावर रविवारी संशयावरून सीमाशुल्क अधिकार्‍यांनी या दोघांच्या सामानाची तपासणी केली होती. यावेळी उपम्याच्या हॉट केसमध्ये 1,72,800 अमेरिकन डॉलर आणि 30,000 हजार युरो सापडले. याची एकूण किंमत 1 कोटी 30 लाख 78 हजार 695 इतकी आहे. हे पैसे जप्त करण्यात आले आहेत. हे दोघेही प्रवासी एकमेकाशी संबंधीत आहेत का? याचीही तपासणी करण्यात येणार आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती सीमा शुल्क विभागाचे आयुक्त चौधरी यांनी दिली