दोघांना पोलिस कोठडी

0

पुणे । लोहगाव विमानतळातील कस्टम विभागाच्या पैशांचा अपहार करणार्‍या एका बँक कर्मचार्‍याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तर दुसर्‍या आरोपीला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. रमेश मगर (35, रा. विमाननगर) याला पोलिस कोठडी तर गोपाळ कांबळे (68) याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांनी 2 कोटी 96 लाख 82 हजार रुपये तसेच परकीय चलनाचा अपहार केला होता.

बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला लोहगाव विमानतळात कस्टमची रक्कम जमा करण्याकरीता काऊंटर उघडण्यास जागा देण्यात आली आहे. येथे हे दोन्ही आरोपी कामाला होते. बँकेच्या कस्टम खात्यात जमा करण्याकरीता कस्टम अधिकार्‍यांनी आरोपींकडे वेळोवेळी रोकड दिली होती. मात्र त्यांनी कस्टमच्या चलन पावत्यांवर बँकेचा शिक्का मारून रक्कम बँकेत भरल्याचे कस्टम विभागास भासवून अपहार केला. मगरने 25 लाखाचे सोने खरेदी केले आहे. तसेच त्याने फ्लॅट 61 लाखाचा फ्लॅट बुक केला आहे. त्याला मिळणारा पगार व त्याच्या संपत्तीशी जुळत नसल्याचे दिसते. तसेच कांबळे यानेही उपयुक्त माहिती दिली नसल्याचे सांगत त्यांच्याकडे सखोल तपास करावयाचा असल्याचे सांगत सरकारी वकिल योगश कदम यांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती.