दोघांवर खुनी हल्ला

0

रहाटणी । पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून तीन ते चार जणांच्या टोळक्याने दोन तरुणांवर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 23) रात्री साडेआठच्या सुमारास रहाटणी येथील कुणाल हॉटेलच्या मागे सुरू असलेल्या मेळ्यात घडली. जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून वाकड पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. राहुल सावंत (वय 21, रा. थेरगाव) आणि भरत पालमपल्ले (वय 23, रा. पिंपळे सौदागर), अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर दीपक धोत्रे, आकाश (संपूर्ण नाव माहीत नाही), अक्षय शिंदे व त्यांच्या इतर साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुल सावंत याने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल आणि दीपक यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते. राहुल हा काल रात्री रहाटणी येथे सुरू असलेला मेळा पाहण्यासाठी गेला होता. मेळ्याच्या गेटवर राहुल आणि भरत थांबले होते. त्यावेळी आरोपींनी पूर्वीच्या भांडणवरून राहुल आणि भरतवर कोयत्याने वार केले.